कालचा पाऊस
कालचा पाऊस
थोडा वेगळा होता
तुझ्या आठवणी शिवाय
वेडा बरसत होता
ओलेचिंब रस्ते
तुझ्या हास्याचं भास देत होते
झाडांच्या सरीतून
तुझे शब्द सांडत होते
गच्च आभाळही
गलबलून गेले होते
तुझ्या निःशब्द वाऱ्यांना
साद घालत होते
माझी चिंब नजर
तुझा शोध घेत होती
पावसाच्या प्रत्येक थेंबात
तुझी चाहूल ऐकत होती
सांज ओलावली
मन काळोखात हरवून गेलं
क्षणभर वाटलं
तूच पुन्हा भेटीला आलं...
— मंथन
मंथन मर्म माझ्या मनाचे

Comments
Post a Comment