Posts

Showing posts from August, 2020

देवा दर्शन दे रे आता...

Image
मूषक वाहन तुझे रे,  तू बुद्धीचा दाता रिद्धी सिद्धी नांदे दारी,  शिव शंकर पिता... हिरवा दुर्वा तुला वाहिला जास्वंदीचा मान हा तुजला पक्वान्नांचा बेत ठरविला मोदक लाडू आवडे तुला सर्व प्रथम तूलाच मान लांब सोंड अन मोठे कान लंबोदर तुज पूजती गण एकदंत नाव शोभे छान सुखकर्ता तू , दुःखहर्ता तू विश्वाचा पालनकर्ता तू तूच कर्ता आणि करविता सर्व गणांचा गणपती तू एकेरी तुज सारे बोलती जसा तू सखा सवंगडी चंद्र हासला खुदुखुदु तुजवरी शाप देऊनी तू मोडली खोडी देवांचा दे तू माझा लाडका गणराया दर्शन दे रे आता ये आम्हा ताराया #मंथन

माझ्या मैत्रिणी

Image
  दोन अनोळखी मुली अचानक आयुष्यात येतात.. नातं आपलं काही असो आयुष्याचा भाग होतात सुख दुःखात माझ्या .. त्या सदा सहभागी .. पुण्यचं म्हणावे माझे या जगी .. तुमचे सारे निर्णय माझ्या होकारावर. इतक्या कमी दिवसात जीव लावतात माझ्यावर मन खूप प्रसन्न असते जेव्हा तुम्ही सोबत असता अन हसून पोट दुखते जेव्हा आपसात भांडत बसता तुम्हाला एकमत करताना उडते माझी तारांबळ झाली तुमची गट्टी की वाढते माझे बळ.. छोट्या जरी असल्या तरी... मोठ्या मोठ्या गोष्टी.. मी होतो लहान अन गाठतात त्या साठी... दिवस खूप आनंदी जातात आता निघून २ पऱ्या येतात मग माझ्या सखी म्हणून.. नातं तुमचं माझं ... असुद्या काही हि बनून रहा अशाच माझ्या छोट्याशा मैत्रीणी.. #मंथन