Posts

Showing posts from April, 2011

वेचतेय मी

Image

एक स्वप्न

Image

शेवटची भेट...

Image
तुला भेटणार म्हणून , घेऊन आलो मी प्रेम भेट , पण मला काय माहीत , ती होती आपली शेवटची भेट॥ नेहमी सारखेच फ़िरत होतो स्वच्छंद , तेव्हाही आठवत होता तू दिलेला गुलकंद... चव येत होती त्या गुलाबाची थेट, पण ती होती आपली शेवटची भेट॥ बोलत होतीस तू तुझ्या मनातल्या भावना, मंत्र मुग्ध होऊन मीही स्पर्शत होतो त्यांना, तुझ्या ओठातून पोहचत होत्या थेट, पण ती होती आपली शेवटची भेट... तुझा तो अबोला अजुनही, काळजात उतरतो थेट, अशी होती आपली, शेवटची भेट.... ♫♥♫प्रशांत पवार♫♥♫

पैंजण

Image

प्रेम... म्हणजे

Image
प्रेम... म्हणजे एक छान संवेदना.... त्यात तुझ्या नि माझ्या, गुंतल्या भावना॥ प्रेम... वाळक्या लाकडाला, फुटलेली नवी पालवी॥ माझी प्रत्येक रात्र, तुझ्या आठवणीत जावी... प्रेम... निर्जल झऱ्याला, आलेली पाणवल॥ तुझ्या माझी प्रेमाचे, फुललेले प्रेम फुल॥ प्रेम... ओसाड जमिनीवर, आलेली एक हिरवळ ... तुझ्या माझ्या प्रेमाची अशीच, फुलत राहो कातरवेळ.. ♫♥♫प्रशांत पवार♫♥♫

तिच्या मनातले

Image
अशीच रोज ती मला लपून पाहते... पहावया नको कुणी जपून पाहते... मनातले अनेकदा लिहून फाडले तरी पुन्हा मनातले लिहून पाहते ... हृदयात तिच्या कोण राहते .. सारखे ती त्याला विचारते .. वाटते तिला बोलावे मजशी , पण न जाणे का बावरते .. मनात तिच्या मूर्ती कुणाची .. सांगड घालत सारखी राहते .. डोळे मिटताच ती स्वप्नात ... निशब्द पणे त्यालाच पाहते .. कळेल का मला कधी .. गूढ तिच्या मनातले .. स्वतःच्या स्वप्नात ती ... अशी कुणाला शोधते ... असेच असते तिचे मन , स्वप्नात गुंतलेले... कळेल का कधी मला. तिच्या मनातले ...? ♫♥♫प्रशांत पवार♫♥♫

एकदा येऊन जा

Image
एकदा येऊन जा तू, एकदा येऊन जा, पुन्हा येऊन मला.. तसाच हसवून जा, मी जसा होतो आधी तसा बनवून जा, हसता हसता मध्येच... थोडासा रडवून जा, 'एकही नाते मला सांभाळता आले कुठे?' तू तरी हा डाग माझ्यानावचा मिटवून जा, तू केलेल्या प्रेमाला, पुन्हा एकदा जागवून जा, प्रत्यक्षात नाही तरी, स्वप्नात तरी येऊन जा, हे तुलाही मान्य आहे एवढे कळवून जा, मी केलेली ती चूक मलाच कळवून जा, एकदा मी संपण्याआधी मला भेटून जा, शेवटच्या घडीला तरी... हाथात हाथ देऊन जा... शेवटची हि हाक तुला पुन्हा एकदा येऊन जा ... ♫♥♫प्रशांत पवार♫♥♫

प्रेम म्हणजे..?

Image

नात्यांच्या सागरात

Image

नाजूक आठवणी

Image

अधुरी साथ

Image

जपलेल्या आठवणी

Image

स्पर्श तुझा

Image