Posts

Showing posts from August, 2011

का असे.....?

Image
का असे? हा अबोला, हे दुरावे...का असे? जवळ तू अन्, मी झुरावे...का असे? जेवढे जवळ यावे, तेवढीच दूर जातेस.. बोटाने हिसका देत मग, नाक मुरडत जातेस...का असे? सुचत नाही तुझ्या शिवाय, मन विचलित होते... तू दिसताच माझे हृदय खुलून येते.. का असे? लपत छपत मग पाहून मला, तुझे गोड हसणे... चेहऱ्या मागे लपविलेले, भाव तुझे जिवघेणे...का असे? रोजचाच झाला हा, छळवाद तुझा .... तुला पुन्हा टाळत असतो, मी आता तुला आठवून..का .. असे? सतत असतात मनात विचार तुझे... तुला पाहून हरपते, भान माझे.. का असे? बोलावे वाटते तुझ्याशी... पण शब्दच येत नाहीत... प्रेमाचे ते अडीच शब्द, बोलताच येत नाहीत..... का असे? वाटते, प्रेमाचे दोन शब्द, तुझ्याशी बोलावे.. पण शब्दांची सांगड, घालताच येत नाहीत...का असे ???.. अबोल माझ्या डोळ्यात, स्वप्न तुझे दिसते... कधीच कोणी बोलकं केलं नाही... मन तुझ्या साठी झुरते..का असे? भोळ्या माझ्या भावनांना जागवते तुझी अदा... तुझ्या कोमल स्पर्शाला, खुणावते तुझी नशा..का असे? कधीच कोणी समजलं नाही... का असे? ©*मंथन* २८/०८/२०११

माझी आई...

Image
माझी आई... माझ्या सुखातच.. असते तिचे सुख... मी दुखी असताना.. ... ती ही होते दुखी.. चुलीवरच्या तव्यावर.. पोळलेले तिचे हात.. शब्बाशी देताना.. ती थोपटलेली पाठ.. चूक होताच.. रागाने मारलेले फटके.. चुकीचे कधी बोललो.. कि गालावर दिलेले चटके.. कितीही रागावली तरी.. प्रेमाने घेतलेली पापी उशीर झाला यायला. तर कधिच गेली नाही झोपी. सारया चुकांना माझ्या.. स्वत:च्या पदरात घेई.. अशी ममतेचा सागर.. ती माझी आई... ©*मंथन* १२/०८/२०११ रात्रौ १२.४३

फक्त एक...

Image
फक्त एक... एक रस्ता... तुझे माझे पावलांचे ठसे उमटलेला.. एक वाट.. आपल्या सोबत चाललेली.. एक ढग... आपल्यावर बरसणारा.. एक वादळ.. तुला माझ्या मिठीत लोटणारं.. एक दु:ख.. तु सोबत नसल्याचे.. एक अश्रु.. पापण्यांमधून पाझरणारा.. एक शब्द.. तुझ्यासाठी पुटपुटलेला.. एक हाक.. तुझी तुझ्या जवळ आणणारी.. एक आरोळी.. तुझ्या प्रेमाला घातलेली.. एक मी... तुझ्यासाठी बनलेला.. अन एक तू... माझ्यासाठी नसलेली.. :( ©*मंथन* आभार: ओंकार तोरसकर

त्या वाटेवरच्या वळणावर...

Image
त्या वाटेवरच्या वळणावर... एकदा उभे राहून वाट पहा.. मी येणारया त्या रस्त्यावर.. ... एकदा डोळे रोखून उभी राहा.. असतील माझे डोळे.. अश्रुंनी भरलेले.. तुला पाहण्यासाठी.. नम्र अन आसूसलेले.. तुझ्या हाकेला.. कान माझे आतूर झाले.. तूला प्रेमाने पुकारायला.. ओठ माझे पुटपुटले.. पुन्हा त्या वळणावर.. येशील ना सखे.. पुन्हा तुझ्या बाहूत.. जकडून घेशील ना सखे.. तुझ्या भेटीची आता.. लागलीय मला आस.. तू खरचं आलीस.. की होत आहेत मला भास.. ©*मंथन* ०८/०८/२०११ रात्रौ ०१.०९

मला एकदा थेंब व्हायचयं..

Image
मला एकदा थेंब व्हायचयं.. अन पाण्यात मिसळून जायचयं... पाण्यात एकरूप होऊन.. स्वत:ला पाहायचयं.. ... मला एकदा थेंब व्हायचयं.. एकदा पावसा सोबत बरसायचयं.. पावसा सोबत बरसून.. श्रुष्टीला फूलवायचयं... मला एकदा थेंब व्हायचयं.. तुझ्या डोळ्यांतून वाहायचयं.. तुझ्या मनातील दु:खांना.. आपलेसे करुन घ्यायचयं.. मला एकदा थेंब व्हायचयं.. तुझ्या गालावरुन ओरघळायचयं.. तुझ्या ओठावर येऊन मग.. तिथेच विरुन जायचयं.. ©*मंथन* ५/८/२०११