आज आरशात स्वत:स पाहतो आहे
मी पुन्हा तुला नव्याने स्मरतो आहे
दूर कुठंतरी बरसला मेघ
अन मोर इथे कधीचा नाचतो आहे
बसला जरी विठ्ठल पंढरपुरी
वारकरी भक्तींनादे चालतो आहे
साद आता ऐकू येत ना कुणाची
तरी भाबडा एकटाच बोलतो आहे
पावसाचा थेंब नाही धरतीला
चातक वेडा थेंबासाठी झुरतो आहे
शब्द शब्द वेचलेस "मंथन" तू
शब्द तुझा ओळीत झुलतो आहे.
#मंथन
Comments
Post a Comment