मला फ़ेसबुक वर भेटा ▼

माझ्या लेखणीतून साकारलेले काही शब्द..©*मंथन*™..

Subscribe:

Pages

Featured Posts

  • करशिल ना तु

    करशिल ना तु स्विकार.. मी दिलेल्या गुलाबाचा... येईल ना गं कोंब.. तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा...? ©*मंथन*™..

  • तुझ्यासाठी आणलेला गुलाब

    तुझ्यासाठी आणलेला गुलाब... तुला पाहुन रुसला होता... त्याच्या पेक्षा सुंदर कुणीच नाही.. हा त्याचा डाव फ़सला होता.. ©*मंथन*™..

  • तुला दिलेले गुलाब

    तुला दिलेले गुलाबाला.. तुझ्या उत्तराची प्रतिक्षा आहे.. तु होकार देशीर.. अशी त्यालाही अपेक्षा आहे.. ©*मंथन*™...

Wednesday, March 28, 2012

चला दोस्त हो, या प्रेमा वर बोलू काही......

(संदीप खरे यांची माफ़ी मागुन...)

उगाच तिचे गुनगान, मनात गात रहा तू..
उगाच तिचे गुनगान, मनात गात रहा तू.
नं पाहताच तिला,तिच्यावर बोलू काही
चला दोस्त हो, या प्रेमा वर बोलू काही......

पाहिल तिला मी येताना,मन गेलं लाजून..
पाहिल तिला मी येताना,मन गेलं लाजून..
मज जवळी येताच ती, शब्द फुटे न काही..
चला दोस्त हो, या प्रेमा वर बोलू काही......

रोज दिसावी ती अशीच मज येता जाता..
रोज दिसावी ती अशीच मज येता जाता..
बोलावे मनीचे वाटे गुज खोलावे मी काही..
चला दोस्त हो, या प्रेमा वर बोलू काही......

मज पाहून हसली, लाजली ती गालामध्ये..
मज पाहून हसली, लाजली ती गालामध्ये
हॄदय फ़िदा पण धडधड थांबेना केल्या काही..
चला दोस्त हो, या प्रेमा वर बोलू काही......

तीही पाहत असते, रोज त्याचीच वाट आता...
तीही पाहत असते, रोज त्याचीच वाट आता...
भेटून मजला, ती हळूच बोलते काही..
चला दोस्त हो, या प्रेमा वर बोलू काही......

जरा तिचे, जरा त्याचे..
जरा तिचे, जरा त्याचे.. बोलू काही..
चला दोस्त हो, या प्रेमा वर बोलू काही.....
©*मंथन*™.. २८/०३/२०१२

Thursday, March 22, 2012

तुझ्या मिठीतला गारवा...


शब्दांच्या जगात..

शब्दांच्या जगात..
सारे कसे स्वच्छ..
मनातल्या भावनांना...
जसा सुगंधी गुच्छ...

शब्दांच्या शाळेत...
शब्दांच्याच भिंती..
शब्दांच्या बाकावर..
सारे शब्द कीती किती..

शब्दांच्या शाळे बाहेर..
शब्दांचेच मळे..
शब्दांच्या मातीत डोले..
शब्दांचीच फ़ुले..

शब्दांच्या जगात या..
शब्दच जगवतात..
शब्दांच्या मांडीवर..
शब्दचं निजवतात..
©*मंथन*™.. २१/०३/२०१२ रात्रौ ११.४०