Posts

मी माझ्या शब्दात...

Image
प्र त्येक क्षणाला आठवण तूझी..   शां त मनात या लहर तुझी..       त री का नाही झाली तू माझी..              प्र त्येक आठवणीत तूला स्थान पहीले..       का कुणास ठाऊक हे असे का घडले..       श हाण्या सारखा वागलो तरी तुझ्या वरच सारं अडले..              प रक्या सारखं तुझ्याशी नाही वागता येत मला..       वा रयासंगे उनाड त्या नाही वाहता येत मला..       र णांगनात या प्रेमाच्या नाही जिंकता आलं मला..       ©*मंथन*™.. २५/०९/२०११

तू आणि मी..

Image
तू आहेस गोरी.. मी थोडा काळा.. तरी आपल्या प्रितीचा.. सगळी कडे बोलबाला.. तू साजूक तूप.. मी गोठलेलं दही.. तुझ्या माझ्या गोष्टींनीच.. भरलेयं माझी नोंद वही.. तूझी असते सतत बडबड... अन माझ्या नावातच शांत.. पण तुझ्या आठवणीं शिवाय... मन माझं असते अशांत.. तू बुटकं वांग.. मी शेंग शेवग्याची.. आपली ही ओळख.. न जाणे केव्हाची... तुला आवडायचे लाजायला.. अन मला तू लाजरी.. तुझी माझी प्रेम कहाणी.. सारया कहाणींत साजरी... अशी तू अन मी.. एक मेकाला फ़सवायचो... स्वत: पेक्षा आपले प्रेमचं... मनात जापायचो.. नाही जमले बोलायला कधी.. तरी केली हिम्मत... ओठात शब्द नसले तरी.. कळतेय प्रेमाची खरी किम्मत.. ©*मंथन*™.. १३/१०/२०११ रात्रौ १२.१५

आयुष्याचं गणित...

Image
आयुष्याचं गणित.... सहज सोडविता सुटत नाही.. कठीण परिश्रम केला असता, पुन्हा ते गुंतून जाई... सुखाची करावी बेरीज, वाटून घ्यावं एकमेका, सुखाच्या शोधात मात्र.. होतात अनेक चुका... दुखाची वजाबाकी करून.. विसरून जावे मनोमनी.. पण त्याच दु:खात कधी कधी, नांदत असतात काही आठवणी.. भावनांना भागावे एकमेकांशी... बाकी शून्य करावी त्यांची... बाकी शून्य झाली तरी.. उत्तर मनात गर्दी भावनांची.. नात्यांचा गुणाकार करू, त्यांना वाढवत जावे... आयुष्याचे गणित असे हे.. त्याला नशिबावर सोडावे. *मंथन*

तु असताना....

Image
ते दिवस पुन्हा..       येणे शक्य नाही..       तु सोबत असताना जे..       आपल्या सोबत बागडायचे...              तु सोबत असताना..       बहरून जायचो मी..       तुझ्या एका भेटीचीही..       आतुरतेने वाट पाहायचो मी..              तु सोबत असताना..       हे आकाश ठेंगणं वाटायचं..       आपल मन ही मग..       त्याला जाऊन गाठायचं..              तु सोबत असताना..       मी फूलपाखरू व्हायचो...       तूझ्या भोवतीने मग..       गर गर गिरट्या घालायचो..              तु सोबत असताना..       दिव...

माझे शब्द

Image
माझे शब्द उमलतात... माझे शब्द बहरतात.. माझे शब्द हसवतात... माझे शब्द रडवतात.... माझे शब्द आठवतात तुला... माझे शब्द  मनात गोठवतात तुला... माझे शब्द क्षणो क्षणी सोबत तुझ्या.. माझे शब्द साथ अशी देतात तुला.. माझे शब्द  अन मी माझे शब्द  अन तू... माझे शब्द तुझ्या आठवणीत... माझे शब्द भरून येतात तुझ्याच साठवणीत..  ©*मंथन*

निदान आता तरी...

Image

फुलांच्या पाकळ्या..

Image