आठवणींचा श्वास
आठवणींचा श्वास
(मंथन मर्म माझ्या मनाचे)
नकळत डोळे
होतात ओले
आठवण तुझी
आली की
मनात तुझ्या
गूंजते गाणे
शब्दात माझ्या
वेदना सांडते
गंध तुझा हा
श्वासात भिनतो
तुझाच विचार
मनात फिरतो
जरी दूर आहेस
जगाच्या टोकाला
तरीही तू आहेस
हृदयाच्या कोपऱ्याला
कधी संधिप्रकाशात
तुझी सावली दिसते
कधी पावसातली
स्मृती मोहरते
तुझं हसू अजून
मनात दरवळतं
आठवणींच्या
श्वासात गुंततं
Comments
Post a Comment