Skip to main content
आज छान दिसतेस..
तो...
आज छान दिसतेस..
स्वर्गातल्या परी सारखी..
ती...
तुला हे बरे जमते रे...
माझी स्तूती खोटी खोटी..
तो..
मला नाही जमत गं...
हे असं खोटं खोटं बोलणं...
ती...
मग बरे जमते तूला..
दु राहूनही मला छळणं...
तो...
मी कुठे छळतोय तुला..
ते काम माझ्या हृदयाचे..
ती..
मला कळतयं हो सारे...
त्या मागे हात कुणाचे..
तो..
तुला कळतयं ना ..
मग कधी सांगितले नाहीस..
ती..
कसे सांगू रे मी तुला..
तू कधी माझे हात मागितले नाहीस..
तो...
तुला माहीत आहे ..
मला रात्र रात्र झोप येत नाही..
ती...
माझी हि अवस्था अशीच रे..
एक क्षण ही तुझ्या शिवाय जात नाही..
तो..
आज या क्षणाला साक्षी ठेऊन.
तुला विचारेन म्हणतोय..
ती...
याच त्या क्षणासाठी...
माझा जिव तळमळतोय...
©*मंथन*™.. ०९/०३/२०१३
Popular posts from this blog
Comments
Post a Comment