मी तोच आहे गं..

मी तोच आहे गं..
तुला थोडा उशीर झाला तरी..
जो तुझी तासनतास वाट पाहायचा..

तू सोबत असलीस की..

सार्‍या जगाला विसरुन जायचा...

तुझ्या एका भेटीसाठी..
क्षण क्षण मोजायचा...

तूझ्या एका स्पर्शाने ज्याचा..
रोम रोम फूलून जायचा...

तू समोर दिसलीस तरी..
स्वत:ला विसरुन जायचा..

तुझ्या प्रत्येक अदेवर...
एक कविता लिहायचा...

तूझ्या प्रत्येक शब्दाला जो...
हृदयात साठवून ठेवायचा...

हो मी तोच आहे गं..
पण तू मात्र बदललीस.. :’(
©*मंथन*™.. ०६/१२/२०१२

Comments