-*मला वाटते*-
तुला हसताना पाहुन वाटते..
तुझ्या गालावरच हसू व्हावं...
तुला रडताना पाहून वाटते..
तुझ्या डोळ्यातला अश्रु व्हावं...
केसां मधल्या फुलावरती..
भुंगा बनून फिरावं..
काना मधला डूल बनून..
तुझ्या संगे मिरवावं..
तुझ्या हातावरच्या मेहंदीमध्ये..
मोर बनून मी नाचावं..
पाया मधल्या पैंजणाचा..
घूंगरु बनून छून छून वाजावं...
मला वाटते सये तुझ संगे..
मी मला विसरावं...
तुझ्या सोबतच माझं..
सारं जिवन सरावं...
©*मंथन*™.. १५/१०/२०१२

Comments
Post a Comment