आता तरी तू माझी होशील का..?

कधी पासुन पाहतोय तुझी वाट..
तु पुन्हा येऊन जाशील का...?
मी तुझ्या साठी थांबलो आहे...
तिथेच तू माझी वाट पाहशील का...?

चंद्रा सोबत चांदणी आहे..
वारयासोबत रागिणी आहे..
तु पण माझ्यासाठी झुरशील का..?
आता तरी तू माझी होशील का..?

बंद या मनात तू पुन्हा...
येऊन राहशील का..?
उघडले पुन्हा हृदयाचे दार..
आता तरी तू माझी होशील का..?
©*मंथन*™.. १३/०२/२०१२

Comments