आता पुन्हा थोडं जगायचय़ं....
आता पुन्हा वाटतयं.. थोडं जागून घ्यावं... न मिळालेले सुख... पुन्हा चाखून पहावं... हसरया हवे सोबत, खळखळून हसावं... गुनगुनणारया भुंग्या संगे... थोडं गुनगुनावं... समुद्राच्या लाटां सारखं.. वाहत जावं... संथ या नदी सारखं.. मन निर्मळ करावं.. उडणारया पक्षाप्रमाणे.. ऊंच ऊंच ऊडावं... आईच्या कुशीत... गाढ झोपी जावं... पुन्हा एकदा थोडंस.. वेड्यासारखं वागायचयं.. त्यासाठीच का कूणास ठाऊक.. मला आता पुन्हा थोडं जगायचय़ं.... ©*मंथन*™..