Posts

गम्मत अंकांची..

Image
आठवणीत तुझ्या मी.. आठवणीत माझ्या तू. दोघे असे गेलो हरवून.. आठवणी बोलतात.. आठवणी खेळतात.. आठवणीत जावे भिजून.. सहजपणे त्यात आपण... दुभागले जातो नकळत.. सात सूरात जरी भिजलो त्यांच्या. शून्यातच आपण तळमळत.. ©*मंथन*™.. २४/०९/२०११ रात्रौ ११.५५

फ़क्त तुझ्यासाठी....

Image
हे मन फ़क्त तुझ्यासाठी.... मनातील या भावना फ़क्त तुझ्यासाठी.... हे हृदय फ़क्त तुझ्यासाठी.... हृदयाचा हा ठोका फ़क्त तुझ्यासाठी.... माझे हे हसणे फ़क्त तुझ्यासाठी.... गालावरची हि खळी माझ्या फ़क्त तुझ्यासाठी.... मी रडतो फ़क्त तुझ्यासाठी.... पापणी वरचा हा अश्रू फ़क्त तुझ्यासाठी.... मि लिहितो शब्द फ़क्त तुझ्यासाठी.... जुळवतो यमक त्यांचे फ़क्त तुझ्यासाठी.... कवितेतील हे भाव फ़क्त तुझ्यासाठी.... कवितेला हे नाव फ़क्त तुझ्यासाठी.... शब्दातला मी फ़क्त तुझ्यासाठी.... तुझ्यातला मी फ़क्त तुझ्यासाठी.... जिवनात या आलोय मी फ़क्त तुझ्यासाठी.... जगशील का ग हा जन्म फ़क्त माझ्यासाठी.... ©*मंथन*™.. २९/०९/२०११  रात्रौ ११.३४

क्षण हे वैराचे...

Image
तुला मला सोबतीला... आहे भास आपलाच.. क्षण हे वैराचे... त्यांना ध्यास आपलाच... मी एक किनारा... तू वाहती लाट... क्षण हे वैराचे... बघ करुन बसलेत थाट... तु तिथे मी इथे... स्वप्नात गुंतलेले.. क्षण हे वैराचे... कसे आहेत मंतरलेले.. तुझ्या माझ्या आठणींना.. आता उरली नाही सीमा.. क्षण हे वैराचे... लादतात विरहाची परीसीमा.. ©*मंथन*™.. २९/०९/२०११  रात्रौ १२.४५

अश्या एका संध्याकाळी...

Image
अश्या एका संध्याकाळी... अश्या एका संध्याकाळी.. मला तू भेटशील का..? मनात तुझ्या साठवलेले.. तू मूक्तपणे माझ्याशी बोलशील का..? दुर असलीस की.. संध्याकाळ मला छळत असते.. तु सोबत असताना ती.. वारयासंगे खेळत असते.. संध्याकाळ चे सुर्यकीरण. तुझा चेहरा फ़ुलवते... तुला उमलताना पाहून.. ते मावळून जाते.. संध्याकाळचा पाऊसही.. तुला पाहताच बरसू लागतो.. तुला चिंब भिजलेली पाहून.. तो स्वत:च मनात लाजतो.. अशी ती मंद संध्याकाळ.. कधी पुन्हा येईल...? अश्या एका संध्याकाळी... पुन्हा मी तुझ्यात गुंग होऊन जाईन..? ©*मंथन* १४/०९/२०११ रात्रौ ११.२८

मी अजुनही तोच आहे..

Image
मी अजुनही तोच आहे.. पहिल्या नजरेतच तुला, तुझ्या पासुन चोरणारा.. तुझ्या ओठावरच्या, प्रत्येक शब्दात बोलणारा.. मी अजुनही तोच आहे.. तुझ्या डोळ्यातल्या, अश्रुंसोबत वाहणारा.. अन तुझ्या स्वप्नात, रोज तुला सतवणारा. मी अजुनही तोच आहे.. तुझ्याशी तासन तास, वेळ काढून बोलत राहणारा.. तुझ्याशी बोलताना.. देहभान विसरणारा... मी अजुनही तोच आहे.. तुला भेटायचे असेल तेव्हा, घड्याळाला पण आपला गुलाम करणारा.. तूझी भेट झाल्यावर.. परत फिरून तुझ्या वाटेकडे पाहणारा... तू मात्र आता बदललीस.. ©*मंथन* १०/०९/२०११ रात्रौ ०१.३४

का असे.....?

Image
का असे? हा अबोला, हे दुरावे...का असे? जवळ तू अन्, मी झुरावे...का असे? जेवढे जवळ यावे, तेवढीच दूर जातेस.. बोटाने हिसका देत मग, नाक मुरडत जातेस...का असे? सुचत नाही तुझ्या शिवाय, मन विचलित होते... तू दिसताच माझे हृदय खुलून येते.. का असे? लपत छपत मग पाहून मला, तुझे गोड हसणे... चेहऱ्या मागे लपविलेले, भाव तुझे जिवघेणे...का असे? रोजचाच झाला हा, छळवाद तुझा .... तुला पुन्हा टाळत असतो, मी आता तुला आठवून..का .. असे? सतत असतात मनात विचार तुझे... तुला पाहून हरपते, भान माझे.. का असे? बोलावे वाटते तुझ्याशी... पण शब्दच येत नाहीत... प्रेमाचे ते अडीच शब्द, बोलताच येत नाहीत..... का असे? वाटते, प्रेमाचे दोन शब्द, तुझ्याशी बोलावे.. पण शब्दांची सांगड, घालताच येत नाहीत...का असे ???.. अबोल माझ्या डोळ्यात, स्वप्न तुझे दिसते... कधीच कोणी बोलकं केलं नाही... मन तुझ्या साठी झुरते..का असे? भोळ्या माझ्या भावनांना जागवते तुझी अदा... तुझ्या कोमल स्पर्शाला, खुणावते तुझी नशा..का असे? कधीच कोणी समजलं नाही... का असे? ©*मंथन* २८/०८/२०११

माझी आई...

Image
माझी आई... माझ्या सुखातच.. असते तिचे सुख... मी दुखी असताना.. ... ती ही होते दुखी.. चुलीवरच्या तव्यावर.. पोळलेले तिचे हात.. शब्बाशी देताना.. ती थोपटलेली पाठ.. चूक होताच.. रागाने मारलेले फटके.. चुकीचे कधी बोललो.. कि गालावर दिलेले चटके.. कितीही रागावली तरी.. प्रेमाने घेतलेली पापी उशीर झाला यायला. तर कधिच गेली नाही झोपी. सारया चुकांना माझ्या.. स्वत:च्या पदरात घेई.. अशी ममतेचा सागर.. ती माझी आई... ©*मंथन* १२/०८/२०११ रात्रौ १२.४३