का असे.....?


का असे?

हा अबोला,
हे दुरावे...का असे?
जवळ तू अन्,
मी झुरावे...का असे?

जेवढे जवळ यावे,
तेवढीच दूर जातेस..
बोटाने हिसका देत मग,
नाक मुरडत जातेस...का असे?

सुचत नाही तुझ्या शिवाय,
मन विचलित होते...
तू दिसताच माझे
हृदय खुलून येते.. का असे?

लपत छपत मग पाहून मला,
तुझे गोड हसणे...
चेहऱ्या मागे लपविलेले,
भाव तुझे जिवघेणे...का असे?

रोजचाच झाला हा,
छळवाद तुझा ....
तुला पुन्हा टाळत असतो,
मी आता तुला आठवून..का .. असे?

सतत असतात मनात
विचार तुझे...
तुला पाहून हरपते,
भान माझे.. का असे?

बोलावे वाटते तुझ्याशी...
पण शब्दच येत नाहीत...
प्रेमाचे ते अडीच शब्द,
बोलताच येत नाहीत..... का असे?

वाटते, प्रेमाचे दोन शब्द,
तुझ्याशी बोलावे..
पण शब्दांची सांगड,
घालताच येत नाहीत...का असे ???..

अबोल माझ्या डोळ्यात,
स्वप्न तुझे दिसते...
कधीच कोणी बोलकं केलं नाही...
मन तुझ्या साठी झुरते..का असे?

भोळ्या माझ्या भावनांना
जागवते तुझी अदा...
तुझ्या कोमल स्पर्शाला,
खुणावते तुझी नशा..का असे?

कधीच कोणी समजलं नाही...
का असे?

©*मंथन* २८/०८/२०११

Post a Comment

Previous Post Next Post