माझी आई...
माझ्या सुखातच..
असते तिचे सुख...
मी दुखी असताना..
...ती ही होते दुखी..
चुलीवरच्या तव्यावर..
पोळलेले तिचे हात..
शब्बाशी देताना..
ती थोपटलेली पाठ..
चूक होताच..
रागाने मारलेले फटके..
चुकीचे कधी बोललो..
कि गालावर दिलेले चटके..
कितीही रागावली तरी..
प्रेमाने घेतलेली पापी
उशीर झाला यायला.
तर कधिच गेली नाही झोपी.
सारया चुकांना माझ्या..
स्वत:च्या पदरात घेई..
अशी ममतेचा सागर..
ती माझी आई...
©*मंथन*
१२/०८/२०११ रात्रौ १२.४३
माझ्या सुखातच..
असते तिचे सुख...
मी दुखी असताना..
...ती ही होते दुखी..
चुलीवरच्या तव्यावर..
पोळलेले तिचे हात..
शब्बाशी देताना..
ती थोपटलेली पाठ..
चूक होताच..
रागाने मारलेले फटके..
चुकीचे कधी बोललो..
कि गालावर दिलेले चटके..
कितीही रागावली तरी..
प्रेमाने घेतलेली पापी
उशीर झाला यायला.
तर कधिच गेली नाही झोपी.
सारया चुकांना माझ्या..
स्वत:च्या पदरात घेई..
अशी ममतेचा सागर..
ती माझी आई...
©*मंथन*
१२/०८/२०११ रात्रौ १२.४३
Tags:
माझ्या कविता
खरचं खूप छान ..
ReplyDeleteप्रिय मित्र प्रशांत
ReplyDeleteतुझा संपूर्ण ब्लॉग पाहता..........
..मनाला खूप समाधान मिळाल... शब्दावरची तुझी पकड पाहून नवल वाटत
प्रत्येक चारोळी आणि कविता खूप खूप वेगळी अन मनाचा ठाव घेणारी आहे
"माझी आई" ही कविता मला खूप आवडली......
"माझं गाव" तर खूपच छान.... मला सुद्धा माझ्या गावाची आठवण आली
मनाची बोलीभाषा असतेच निराळी
आज कुठे काल कुठे.... मन उडते आभाळी
तुझ्या कविता वाचून.. वाटल...
कवितांचा पाऊस म्हणतात तो हाच का?..
मनाचा ताबा सुटलेल्या भावाला
लयबद्ध शब्दांत कवितेतून भांधून ठेवण हे कमीच कवींना जमत..
आणि त्यात गावाच्या मातीचे संस्कार मिसळल्यावर तुमच्यासारखा कवी उभा राहतो...
मला तर खूप आवडला तुमचा ब्लॉग
असंच लिहित रहा.... पुढे जा..
मनाचा ठाव घेणारे शब्द... वेचत वेचत... मराठी साहित्यात मोलाची भर घाला..
आई जगदंबा पाठीशी आहे...........
जय शिवराय
आपला मित्र
गणेश पावले (मुंबई)