माझ्या स्वप्नातली परी..


काल माझ्या स्वप्नात...
एक आली होती परी...
मीचमीच होते डोळे तीचे..
अन होती गोरी गोरी...

शुभ्र पांढरे कपडे
घालून अंगावरती
इवले इवले पंख
शोभे पाठीवरती

फिरवून तिने हातातली
सोनेरी जादुची छडी
आणली माझ्यासाठी
बसायला घोडा गाडी

हळूच म्हटले परीला...
सोबत ऊडायचय़ं मला
म्हणते कशी थांब मुला
अजुन खुप शिकायचं तुला....

ऊडण्यासाठी कुठे ग ...
सांग शिकवन्या भरतात ?
एक जादूची कांडी अन ..
दोन पंख असावे लागतात..

हळू हळू आमच्यात...
खूप गट्टी झाली...
तिची कट्टी करायची
कधी वेळ नाही आली

सारीपाठ, लपंडाव खूप
खेळ आम्ही खेळलो
सोबत खेळता खेळता..
पाहतो तर पहाट झाली...

आज रात्री पुन्हा येईन..
असे सांगून ती गेली...
आल्यावर मग आपण..
खेळू लपंडावाची खेळी...
©*मंथन*™.. १८/०२/२०१२

1 Comments

Previous Post Next Post