फक्त एक...
एक रस्ता... तुझे माझे पावलांचे ठसे उमटलेला..
एक वाट.. आपल्या सोबत चाललेली..
एक ढग... आपल्यावर बरसणारा..
एक वादळ.. तुला माझ्या मिठीत लोटणारं..
एक दु:ख.. तु सोबत नसल्याचे..
एक अश्रु.. पापण्यांमधून पाझरणारा..
एक शब्द.. तुझ्यासाठी पुटपुटलेला..
एक हाक.. तुझी तुझ्या जवळ आणणारी..
एक आरोळी.. तुझ्या प्रेमाला घातलेली..
एक मी... तुझ्यासाठी बनलेला..
अन
एक तू... माझ्यासाठी नसलेली.. :(
©*मंथन*
आभार: ओंकार तोरसकर
Tags:
माझ्या कविता