त्या वाटेवरच्या वळणावर...


त्या वाटेवरच्या वळणावर...
एकदा उभे राहून वाट पहा..
मी येणारया त्या रस्त्यावर..
...एकदा डोळे रोखून उभी राहा..

असतील
माझे डोळे..
अश्रुंनी भरलेले..
तुला पाहण्यासाठी..
नम्र अन आसूसलेले..

तुझ्या हाकेला..
कान माझे आतूर झाले..
तूला प्रेमाने पुकारायला..
ओठ माझे पुटपुटले..

पुन्हा त्या वळणावर..
येशील ना सखे..
पुन्हा तुझ्या बाहूत..
जकडून घेशील ना सखे..

तुझ्या भेटीची आता..
लागलीय मला आस..
तू खरचं आलीस..
की होत आहेत मला भास..
©*मंथन*
०८/०८/२०११ रात्रौ ०१.०९

Post a Comment

Previous Post Next Post