मला एकदा थेंब व्हायचयं..


मला एकदा थेंब व्हायचयं..
अन पाण्यात मिसळून जायचयं...
पाण्यात एकरूप होऊन..
स्वत:ला पाहायचयं..

...मला एकदा थेंब व्हायचयं..
एकदा पावसा सोबत बरसायचयं..
पावसा सोबत बरसून..
श्रुष्टीला फूलवायचयं...

मला एकदा थेंब व्हायचयं..
तुझ्या डोळ्यांतून वाहायचयं..
तुझ्या मनातील दु:खांना..
आपलेसे करुन घ्यायचयं..

मला एकदा थेंब व्हायचयं..
तुझ्या गालावरुन ओरघळायचयं..
तुझ्या ओठावर येऊन मग..
तिथेच विरुन जायचयं..
©*मंथन*
५/८/२०११

Post a Comment

Previous Post Next Post