पुन्हा लहान व्हावेसे वाटतेय..



आज पुन्हा लहान व्हावेसे वाटतेय..
आईच्या कुशीत झोपावेसे वाटतेय..
हट्ट करुन बाबांकडे पुन्हा एकदा..
पाहीजे ते मागावेसे वाटतेय..


...नको वाटणारया त्या शाळेत,
पुन्हा जावेसे वाटतेय..
मागच्या बाकावरच्या मित्रांना..
पुन्हा भेटावेसे वाटतेय..

आईने मारला धपाटा..
त्याचे मऊ मऊ व्रण..
बाबांच्या धाका मागे..
दडलेले ते प्रेम...

कधी येतील ते..
दिवस सुखाचे असे पुन्हा वाटतेय..
पुन्हा एकदा तरी..
लहान व्हावेसे वाटतेय..
©*मंथन*
३०/०७/२०११

Post a Comment

Previous Post Next Post