आपल्या प्रीतीचा पहिला पाऊस...



आपल्या प्रीतीचा पहिला पाऊस...


ढगाळ आकाश अन..
गार वारा सुटलेला..
तुझ्या आठवणींचा मनात..
...पाऊस दाटलेला..

ढगाळलेल आकाश..
मला पाहून हसलं..
वारा गुदगुल्या करू लागला..
अन माझं मन फसलं..

आकाशातून हळूच एक थेंब..
माझ्या हातावर आला..
त्याचा तो स्पर्श तेव्हा..
तुझी आठवण देऊन गेला..

वारा खट्याळ वेड्यासारखा..
पावसा सोबत खेळू लागला..
तुझ्या आठवणीही मग..
मनात मला वेधू लागल्या..

हळूच तुझा आवाज..
काना मध्ये घुमू लागला..
तू जवळ असल्याच भास होऊन..
पाऊस जोरात कोसळू लागला..

माझ्या मनात तुझा अन तुझ्या मनात माझा..
हळुवार गारवा दाटत होता...
तेव्हाच आपल्या प्रीतीचा पहिला पाऊस...
आपले थेंब वाटत होता..
©*मंथन*
२६/०७/२०११

Post a Comment

Previous Post Next Post