कुणास ठाऊक...?
या पुढे मी तुला... कधी..
भेटेन कि नाही कुणास ठाऊक..?
अन भेटलो तरी...पहिल्यासारखी..
...मैत्री दाटेल कि नाही कुणास ठाऊक...?
तुझ्या नजरेला नजर..
मिळवता येईल कि नाही कुणास ठाऊक...?
पुन्हा तुझ्या डोळ्यातील अश्रू..
पुसता येतील कि नाही कुणास ठाऊक...?
तू आता माझ्या सोबत..
गप्पा मारशील कि नाही कुणास ठाऊक...?
त्या गप्पांमध्ये पुन्हा आपण..
हरवून जाऊ कि नाही कुणास ठाऊक...?
तुझ्या प्रत्येक शब्दाला आता..
प्रतिशब्द देता येईल कि नाही कुणास ठाऊक...?
तुझ्या प्रत्येक वाक्यावर..आता
मला सल्ला देता येईल कि नाही कुणास ठाऊक...?
तू कधी रुसलीस कि..
तुझी समजूत काढता येईल कि नाही कुणास ठाऊक...?
अन मी समजूत काढली तरी,
तुझा रुसवा जाईल कि नाही कुणास ठाऊक...?
आता पर्यंत समजून घेतलेस..
या पुढे समजून घेशील कि नाही..कुणास ठाऊक...?
©® *मंथन*
२२/०७/२०११
या पुढे मी तुला... कधी..
भेटेन कि नाही कुणास ठाऊक..?
अन भेटलो तरी...पहिल्यासारखी..
...मैत्री दाटेल कि नाही कुणास ठाऊक...?
तुझ्या नजरेला नजर..
मिळवता येईल कि नाही कुणास ठाऊक...?
पुन्हा तुझ्या डोळ्यातील अश्रू..
पुसता येतील कि नाही कुणास ठाऊक...?
तू आता माझ्या सोबत..
गप्पा मारशील कि नाही कुणास ठाऊक...?
त्या गप्पांमध्ये पुन्हा आपण..
हरवून जाऊ कि नाही कुणास ठाऊक...?
तुझ्या प्रत्येक शब्दाला आता..
प्रतिशब्द देता येईल कि नाही कुणास ठाऊक...?
तुझ्या प्रत्येक वाक्यावर..आता
मला सल्ला देता येईल कि नाही कुणास ठाऊक...?
तू कधी रुसलीस कि..
तुझी समजूत काढता येईल कि नाही कुणास ठाऊक...?
अन मी समजूत काढली तरी,
तुझा रुसवा जाईल कि नाही कुणास ठाऊक...?
आता पर्यंत समजून घेतलेस..
या पुढे समजून घेशील कि नाही..कुणास ठाऊक...?
©® *मंथन*
२२/०७/२०११
Tags:
माझ्या कविता