मी अजुनही तोच आहे..


मी अजुनही तोच आहे..
पहिल्या नजरेतच तुला,
तुझ्या पासुन चोरणारा..
तुझ्या ओठावरच्या,
प्रत्येक शब्दात बोलणारा..

मी अजुनही तोच आहे..
तुझ्या डोळ्यातल्या,
अश्रुंसोबत वाहणारा..
अन तुझ्या स्वप्नात,
रोज तुला सतवणारा.

मी अजुनही तोच आहे..
तुझ्याशी तासन तास,
वेळ काढून बोलत राहणारा..
तुझ्याशी बोलताना..
देहभान विसरणारा...

मी अजुनही तोच आहे..
तुला भेटायचे असेल तेव्हा,
घड्याळाला पण आपला गुलाम करणारा..
तूझी भेट झाल्यावर..
परत फिरून तुझ्या वाटेकडे पाहणारा...

तू मात्र आता बदललीस..

©*मंथन* १०/०९/२०११ रात्रौ ०१.३४

1 Comments

Previous Post Next Post