अश्या एका संध्याकाळी...

अश्या एका संध्याकाळी...

अश्या एका संध्याकाळी..
मला तू भेटशील का..?
मनात तुझ्या साठवलेले..
तू मूक्तपणे माझ्याशी बोलशील का..?

दुर असलीस की..
संध्याकाळ मला छळत असते..
तु सोबत असताना ती..
वारयासंगे खेळत असते..

संध्याकाळ चे सुर्यकीरण.
तुझा चेहरा फ़ुलवते...
तुला उमलताना पाहून..
ते मावळून जाते..

संध्याकाळचा पाऊसही..
तुला पाहताच बरसू लागतो..
तुला चिंब भिजलेली पाहून..
तो स्वत:च मनात लाजतो..

अशी ती मंद संध्याकाळ..
कधी पुन्हा येईल...?
अश्या एका संध्याकाळी...
पुन्हा मी तुझ्यात गुंग होऊन जाईन..?

©*मंथन* १४/०९/२०११ रात्रौ ११.२८

Post a Comment

Previous Post Next Post