येशील ना रे पुन्हा…

charolya, kavita

कसं सांगू तुला मी…
तुझ्यावर किती प्रेम करते…
रोज रोज तुझ्यासाठीच…
कण कण मरते…

मी तुझी होणार नाही…
हे मलाही कळतेय…
तरी काळीज तुझ्यासाठी…
खुप तळमळतेय…

काळजी घे स्वतःची तू…
मी सोबत नसताना…
उराशी कवटाळून घे…
तुझ्या गोड स्वप्नांना…

पाहायचय तुला…
आनंदाने बागडताना…
ओठावर हसू अन…
सुखात नांदताना…

तुझी होऊ शकले नाही…
तरी तुझ्या सोबत असेन रे…
तुझ्या प्रत्येक सुखात माझा…
खारीचा वाटा असेल रे…

कोण बोलते दुर होऊन…
प्रेम सफल होत नाही…
त्यागाचे दुसरे नाव प्रेम…
अन बाकी काही नाही…

दुर गेलो म्हणून…
नाते तुटत नाही…
अन दुर जाऊन तुटेल असे…
आपले नाते नाही…

एवढेच एक सांगते तुला…
तुझी काळजी घेत रहा…
मला सुखात पाहायचे…
मग तुझी तू ही सुखात रहा…

तुझ्या माझ्या नात्याचा…
इथे असा अंत नाही…
तुझ्या भेटीसाठी पुन्हा…
मन तडफत राही…

पुन्हा तुझी एक भेट…
घ्यावी वाटतेय…
तेव्हाच सारी सुखे…
जगावी वाटतेय…

मला भेटायला...
येशील ना रे पुन्हा…
माझी वाट तू..
पाहशील ना रे पुन्हा…

त्याचं चौकात उभा...
राहशील ना रे पुन्हा…
पाहून मला येताना धावत…
पुढे येशील ना रे पुन्हा…

समोर येताच तुझ्या मी…
घट्ट मिठीत घेशील ना रे पुन्हा….
निरोप घेताना तुझा नको जाऊ...
म्हणशील ना रे पुन्हा…
©*मंथन*™...

Post a Comment

Previous Post Next Post