तुझ्या माझ्या विरहाचा पाऊस..


सुर्य हळू हळू..
अस्ताकडे झुकला...
तुझ्या आठवणीने..
पुन्हा वेढले मला..

सुर्यास्ता आधीच नभात...
सारीकडे काळोख झाला..
तुझ्या माझ्या विरहाचा..
पाऊस दाटून आला

काळोख्या सायंकाळी..
त्याने डाव साधला..
तुझ्या गोड आठवणीसोबत..
त्याने भिजवले मला..

आठवला तो पहीला पाऊस..
तुझ्या माझ्या प्रीतीचा..
एक एक ठोका वाढू ..
लागला माझ्या छातीचा..

चिंब भिजवून त्याने मला..
आठवनीत लोटले...
हृदयात देखील आठवणींचं..
खोल डबके साठले...

मला इकडे भिजवत असताना..
तो तुलाही भिजवत असेल..
तुझ्या हृदयात देखील..
माझ्या आठवनी फ़ुलवत असेल..

आठवली ती पावसाळी संध्याकाळ..
जी झाली होती आपली..
तीला प्रत्येक क्षणो क्षणी..
मनातल्या मनात जपली ..

बरसून गेला तो पाऊस..
ओसरला त्याचा पारा..
जाता जाता त्याने हृद्यात..
पसरवला आठवणींचा पसारा..
©*मंथन*™.. ०६/०६/२०१२

Post a Comment

Previous Post Next Post