ढगाळ सारं वातावरण ..
दाट धुकं दाटलेले..
नुकतीच पावसाची रपरप थांबून..
ढग ही सारे आटलेले..
तेवढ्यात एक गार...
वार्याची झुळूक कुठूनशी आली..
सार्या अंगात मग..
शिरशिरी येऊन गेली..
हळू हळू पावसानं पुन्हा..
आपलं सामाज्य पसरवलं..
भर दिवसा काळोख करुन..
भिरभिरणार्या वार्याही फ़सवलं..
©*मंथन*™..