माझं हृदय हरवलयं...


माझं हृदय हरवलयं...
कूणी पाहिले का..?
काल तर धडधडत होते..
आज कुणी ऐकले का..?

रोज सारखेच आज बागेत..
गेलो होतो फ़िरायला..
तिला तिथं पाहून..
मन लागलं झुरायला...

अशी जादू केली तिने..
पाहिल्याचं नजरेत..
येता येता विसरुन आलोय..
हृदय त्या बागेत...

ना नाव ना पत्ता..
कुठं कशी शोधू तिला..
माझ्या हृदयाच्या तारांवर..
झुलतेय ती अलगद झुला...

हरवलेले माझं हृदय..
मिळेल का हो तीला..
तिच्या सहीत मिळावे..
अशीच आशा आहे मला.
©*मंथन*™.. १९/०६/२०१२

Post a Comment

Previous Post Next Post