मलाही वाटत कधी कधी..
देवळात जाऊन यावं..
उधानलेल्या मनाला..
थोडं शांत करावं...
पण तिथं गेल्यावर..
वाटते एकच भिती..
मनातल्या आठवणींना..
येईल पुन्हा भरती..
हेच काय ते कारण..
मी देवळात जात नाही..
त्याने लिहिलेल्या नशिबाला..
त्याच्याचं समोर मांडत नाही..
©*मंथन*™..