ती पावसाळी संध्याकाळ...


तुझी माझी भेटायची वेळ..
रोजचीच ठरलेली..
दिवस उजाडून वाट पाहयची..
त्या सुंदर कातरवेळी..

भेटण्यास तुझं ...
आतूर मी झालेलो..
तुला पाहुन मग..
गहीवरुन आलेलो..

निरोपाची ती वेळ..
येत होती जवळ..
तेव्हढ्यात ढगांमध्ये..
सुरु झाली घालामेळ..

रिमझिम पावसाने..
अचूक साधली वेळ ..
वेड्या वार्‍यानही सुरु..
केला पावसासोबत खेळ ..

मी म्हणालो जातो आता..
पाऊस येतोय बघ..
थांब ना जरासा..
वर खुप भरुन आलेत ढग...

रोज सारखाच आज पण..
तू विसलास ना छत्री..
तू आणतेस रोज..
याची मला असते खात्री..

वाटलेच मला तू..
मला असेच म्हणणार..
पण माझ्या छत्रीत मी..
कुणा अनोळख्याला नाही घेणार..

भिज आज पावसात...
चिंब अन मनसोक्त..
भिजताना एकच कर..
माझ्या हृदयाची काळजी घे फ़क्त..

सुरु होताच पावसाची..
एकच संततधार..
येना रे छत्रीत पटकन..
का भिजून करतोस मला ठार..

तुझ्या पास येण्याचा..
हाच एक होता बहाणा..
तरी आवरला हात मी..
तसा तो आहे शहाणा...

पावसाच्या गारव्याने..
एकमेका जवळ आलो..
त्या पावसाळी संध्याकाळी..
मी तुझ्या स्पर्शाने भिजून गेलो...
©*मंथन*™.. १८/०६/२०१२

Post a Comment

Previous Post Next Post