तुझा आवाज ऐकू येताच..
मी तो खिन्न होऊन ऐकायचे..
तू समोर दिसताच...
मी तुझ्या कडे सरावले जायचे...
तू जवळ येताच..
हात तुझ्या मिठीसाठी तरसायचे..
तू उदास होताच..
माझं ही मन उदास व्हायचे..
तू रडू लागताच..
अश्रू माझ्या डोळ्यातून वाहायचे..
तुला हसताना पाहीले..
की माझ्याही गालावर हसू उमटायचे..
तुला ठेच लागताच..
रक्त माझ्या पायातून यायचे..
तू पावसाचा आनंद लुटायचा..
अन मी चोरुन पाहयचे..
तू चिंब भिजायचे..
अन मी छ्त्रीत कुडकुडायचे..
तूला सर्दी होताच..
माझ्याकडे शिंकानी यायचे..
तु दु:खी होताच..
आधी मला आठवायचे...
खरंच असेच असते का प्रेम...?
हे दोघांनाही प्रश्न पडायचे..
सुटता सुटले नाहीत ते..
की आपणचं त्यांना खोडायचे.. :)
©*मंथन*™.. ०३/०६/२०१२
Tags:
माझ्या कविता