नाही मी पण आनंदी.. |
येऊन तुझ्या पासुन दुर... |
नाही विसरलो तुला अजुन.. |
वाहतोय डोळ्यातून अश्रुंचा पुर.. |
मी केलेल्या गुन्ह्याची.. |
शिक्षा मी दिली तुला... |
वरवर असे दिसले तरी... |
त्याच्या मलाच बसतात कळा... |
सारा खेळचं नशिबाचा.. |
त्या पुढे काय करणार हा पामर.. |
तू असो किवा मी... |
दोघेही त्याचे चाकर... |
डोळ्यांनी पाहीलेले स्वप्न... |
स्वत:च्या हाताने उद्धवस्त केले.. |
सजवलेले घरकूल आपले.. |
मी सारे नष्ट केले... |
न राहून सांगावेसे वाटतेय.. |
यात दोष ना कूणाचा... |
कुणाला ही दोष दिला तरी.. |
सारा हा खेळ नशीबाचा.. |
©*मंथन*™.. २८/०५/२०१२ रात्री ११.४० |
Tags:
माझ्या कविता