धो धो नाहीतर रिम झिम ये..
मुसळधार नाहीतर सरींवर ये..
आज नाहीतर उद्या तरी ये...
सकाळी नाहीतर रात्री तरी ये..
या जमिनीला शमविण्यासाठी ये..
तिची तहान भागविण्यासाठी ये..
सर सर सर सर सरींसोबत ये..
कड कड कड कड विजांसोबत ये..
वाळक्या ओंडक्याला नवे जिवन द्यायला ये....
जुन्या या फ़ंदीला नवी पालवी फ़ुलवायला ये..
सुकलेल्या झर्यामध्ये खळखळायला ये..
नदी सोबत पुन्हा एकदा वाहायला ये..
येशील ना रे तू..नवी उम्मेद घेऊन..
इंद्र्धनू च्या रंगा मागुन..सप्त रंगात न्हाऊन...
खाली धरती वर आकाश..चिंब चिंब होईल सारे..
तुझ्या प्रत्येक थेंबाने..श्रुष्टी गाईल नवे गाणे..
©*मंथन*™.. ०४/०६/२०१२
Tags:
माझ्या कविता