(संदीप खरे यांची माफ़ी मागुन...)
उगाच तिचे गुनगान, मनात गात रहा तू..
उगाच तिचे गुनगान, मनात गात रहा तू.
नं पाहताच तिला,तिच्यावर बोलू काही
चला दोस्त हो, या प्रेमा वर बोलू काही......
पाहिल तिला मी येताना,मन गेलं लाजून..
पाहिल तिला मी येताना,मन गेलं लाजून..
मज जवळी येताच ती, शब्द फुटे न काही..
चला दोस्त हो, या प्रेमा वर बोलू काही......
रोज दिसावी ती अशीच मज येता जाता..
रोज दिसावी ती अशीच मज येता जाता..
बोलावे मनीचे वाटे गुज खोलावे मी काही..
चला दोस्त हो, या प्रेमा वर बोलू काही......
मज पाहून हसली, लाजली ती गालामध्ये..
मज पाहून हसली, लाजली ती गालामध्ये
हॄदय फ़िदा पण धडधड थांबेना केल्या काही..
चला दोस्त हो, या प्रेमा वर बोलू काही......
तीही पाहत असते, रोज त्याचीच वाट आता...
तीही पाहत असते, रोज त्याचीच वाट आता...
भेटून मजला, ती हळूच बोलते काही..
चला दोस्त हो, या प्रेमा वर बोलू काही......
जरा तिचे, जरा त्याचे..
जरा तिचे, जरा त्याचे.. बोलू काही..
चला दोस्त हो, या प्रेमा वर बोलू काही.....
©*मंथन*™.. २८/०३/२०१२
Tags:
विडंबन