तू आणि मी..

तू आहेस गोरी..
मी थोडा काळा..
तरी आपल्या प्रितीचा..
सगळी कडे बोलबाला..

तू साजूक तूप..
मी गोठलेलं दही..
तुझ्या माझ्या गोष्टींनीच..
भरलेयं माझी नोंद वही..

तूझी असते सतत बडबड...
अन माझ्या नावातच शांत..
पण तुझ्या आठवणीं शिवाय...
मन माझं असते अशांत..

तू बुटकं वांग..
मी शेंग शेवग्याची..
आपली ही ओळख..
न जाणे केव्हाची...

तुला आवडायचे लाजायला..
अन मला तू लाजरी..
तुझी माझी प्रेम कहाणी..
सारया कहाणींत साजरी...

अशी तू अन मी..
एक मेकाला फ़सवायचो...
स्वत: पेक्षा आपले प्रेमचं...
मनात जापायचो..

नाही जमले बोलायला कधी..
तरी केली हिम्मत...
ओठात शब्द नसले तरी..
कळतेय प्रेमाची खरी किम्मत..
©*मंथन*™.. १३/१०/२०११ रात्रौ १२.१५

1 Comments

Previous Post Next Post