आयुष्याचं गणित...

आयुष्याचं गणित....
सहज सोडविता सुटत नाही..
कठीण परिश्रम केला असता,
पुन्हा ते गुंतून जाई...

सुखाची करावी बेरीज,
वाटून घ्यावं एकमेका,
सुखाच्या शोधात मात्र..
होतात अनेक चुका...

दुखाची वजाबाकी करून..
विसरून जावे मनोमनी..
पण त्याच दु:खात कधी कधी,
नांदत असतात काही आठवणी..

भावनांना भागावे एकमेकांशी...
बाकी शून्य करावी त्यांची...
बाकी शून्य झाली तरी..
उत्तर मनात गर्दी भावनांची..

नात्यांचा गुणाकार करू,
त्यांना वाढवत जावे...
आयुष्याचे गणित असे हे..
त्याला नशिबावर सोडावे.

*मंथन*

Post a Comment

Previous Post Next Post