प्रेम तुझं मनात वसलय़ं...

प्रेम तुझं मनात वसलय़ं...
प्रेम तुझं हृदयात घूसलयं..
प्रेम तुझं प्रत्येक श्वासात...
प्रेम तुझं माझ्या नसा नसात...

प्रेम तुझं सोबत माझ्या..
प्रेम तुझं स्वप्नांत माझ्या..
प्रेम तुझं आहे प्रत्येक क्षणात...
प्रेम तुझं आहे कणा कणात...

प्रेम तुझं या भिरभिरत्या वारयात..
प्रेम तुझं या निरभ्र आकाशात...
प्रेम तुझं त्या वाहणारया झरयात...
प्रेम तुझं या अथांग सागरात...

प्रेम तुझं माझ्या या शब्दात...
प्रेम तुझं या कोरया कागदात..
प्रेम तुझं दडलयं हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात
प्रेम तुझं भिनलयं माझ्या रक्ता रक्तात...
©*मंथन*™.. ०१/१०/२०११  रात्रौ ०१.००

Post a Comment

Previous Post Next Post