तुला भेटावेसे वाटते पुन्हा...

तुला भेटावेसे वाटते पुन्हा...
पण समोर येतोय माझा गुन्हा...
सावरतोय मी आता स्वत:ला...
हा दोष माझा देऊ मी कुणाला..

आता दोष मला कळतोय...
या विरहाच्या दुखात जळतोय..
रोज साय़ंकाळी मी तिथेच...
तो रस्ता चाळतोय...

आता त्या वाटा ही...
परक्या सारख्या वागतात...
मला तिथे पाहताच ....
त्या नागमोडी वळतात...

पुन्हा तूला भेटायचे आहे....
गुढ मनातलं तुझ्यासोबत वाटायचे आहे...
पुन्हा एकदा डोळ्यात भरून ...
तुझ्या संगे थोडे भांडायचे आहे...

येशिल का गं तू पुन्हा...
त्या आंब्याच्या पारावर...
पुन्हा एकदा विसरुन जाऊ...
जगाला या दुरवर..
©*मंथन*™.. ०४/१०/२०११ 

Post a Comment

Previous Post Next Post