राखीचा गंध

 


गोंडस हातावर बांधली राखी,
डोळ्यांत चमक आणि हसू ओसंडले,
गेल्या वर्षाच्या आठवणी उलगडल्या,
गप्पा, भांडणं, सगळं पुन्हा उमटलं.

भावाचा हात घट्ट धरून,
बहिण म्हणाली, "नेहमी सोबत राहा",
भावानेही मनोमन वचन दिलं,
"तू सदा सुखी राहा".

कधी लांब, कधी जवळ असलो तरी,
बंध आपला तसाच घट्ट राहील,
राखीच्या धाग्यात गुंफलेला,
प्रेमाचा सुवास नेहमी दरवळत राहील.

रेशमी धाग्यात गुंफून,
नाते गोड बांधले,
एकमेकांना साथ देण्याचे,
वचन त्यांनी घेतले.

© मंथन

Post a Comment

Previous Post Next Post