नव्याने प्रेमात पडताना


एके दिवशी अचानक
तिची भेट झाली
पाहताच क्षणी ती
आपलीशी झाली

समोर आली माझ्या
अन नजर झुकवली
तिला न कळताच
तिला चोरून पाहिली

थोडा वेळ गेला
वाटले बोलावं
तिच्या मनात काय
एकदा विचारावं

पाहून तिला लाजताना
न बोलताच आलो
निघताना त्या क्षणांना
सोबत घेऊन निघालो

वाटले नव्हते तिचा
लवकर येईल होकार
रंगवलेले स्वप्न एक
होईल असे साकार

पुन्हा एक भेट झाली
फक्त मी अन ती
मी बोलत होतो
अन ती शांत होती

माझ्या प्रत्येक प्रश्नाला
होतं हुंकारांने उत्तर
डोळे मात्र निहाळत होते
माझ्या शब्दांमधले अत्तर

हळूहळू गाठीभेटी
लागल्यात आता वाढू
नवं नातं लागलेय
आता हृदयात फुलू

तिची लागलेय त्याला
आता हळूहळू ओढ
तीही आता लपवत नाही
हृदयाची ही खोड

नव्याने प्रेमात पडताना
ते दोघेही बावरतात
एकमेकांच्या सोबतीने
आता ते ही बागडतात
©मंथन

Post a Comment

Previous Post Next Post