©*मंथन*™...

  • शब्द तुझ्या साठी लिहिलेले…
  • शब्द तुझ्या हसण्यावर लिहीलेले…
  • शब्द तुझ्या रुसण्यावर रचलेले…
  • शब्द तुझ्या हृद्यात गुंतलेले…
  • शब्द तुझ्या मनात मिसळलेले…
  • येथे माझं काहीच नाही… मी अन माझे शब्द…
  • फक्त तुझ्यासाठीचं जन्मलेले…

नवं नातं

नवे नाते

मी पण आता
नवे नाते जोडू पाहतोय
काही जुन्या नात्यांना
दूर सारून
दूर सारली म्हणजे ती नावडती नाहीत
पण .....
आयुष्य प्रत्येकाला वेळ देते
कधी अपेक्षित कधी अनपेक्षित
नाती जोडायला
काही जुळतात आयुष्य भर
आनंद देतात
अन काही
थोड्या वेळातच आपलीशी होतात अन अचानक आपल्या ही नकळत परकी होऊन जातात

पण ती नाती विसरता येतात का?
माझ्या मते कधीच नाही...
मग तरीही...
तरीही आपण
नवी नाती जोडत जातो
प्रत्येक नव्या वाटेवर कुणी नवा जोडला जातो

मी पण आता एका नव्या नात्याकडे वाटचाल चालू केली आहे
नकळत एक अनोळखी आपलेसे वाटू लागलेय
कोण म्हणतं माणसाचं मन चंचल आहे
एखाद्याशी हृदय जुळलं की त्याच्या शिवाय काहीच सुचत नाही
अशीच असतात का सारी नाती
अन अशीच असुद्या
आपल्या उद्या साठी
माणूस म्हणून एक ओळख
प्रत्येक नव्या नात्यातून उलघडणारी.
©मंथन

Share on Google Plus

About प्रशांत पवार

Google+ Followers

यांना नक्की भेट द्या

Followers