बघ तुझ्या हृद्याचे ठोके...
कसे धडधडत आहेत...
नको जाऊ दुर सोडून...
हळूच मला बोलत आहेत...
स्पर्श होताच माझा...
वेग त्यांचा वाढतोय...
प्रत्येक ठोका तुझा..
मला तुझ्याजवळ ओढतोय...
रहा म्हणतात ते मला...
तुझ्या हॄद्याच्या कुपित...
नाही कळणार कुणाला...
तुझं माझं हे गुपित...
तुझ्या माझ्या नकळत..
सये काही तरी घडतेय..
माझं ही हृद्य आता..
तुझ्या नवाने धडधडतेय...
ऐक तू एकदा ते...
तुलाच साद घालतेय...
तुझी हाक ऐकण्यासाठी...
तुझ्या दिशेने पळतेय...
कधी कसे नाही कळले..
सारे कसे घडले...
कळतेय का तुला सये...
माझे मन तुझे झाले...
©*मंथन*™...
Tags:
माझ्या कविता