तु सोबत असताना...
मी कधीच एकटा नसतो...
तुझ्या प्रितिच्या छायेत..
मी विहरत असतो...
तू काही बोललीस की..
तो शब्द मी जपून ठेवतो..
तू रुसुन बसलीस की..
त्या शब्दाची कविता करतो..
तुझ्या प्रत्येक स्पर्शावर..
माझा शब्द सावरतो...
तू हसून उत्तर दिलेस की..
शब्द ही वेडा मोहरतो..
तू सोबत असताना..
मी माझाचं नसतो...
तू सोबत असताना...
मी फक्त तुझा असतो...
©*मंथन*™...
Tags:
माझ्या कविता