तुझी माझी एक आठवणीतली भेट..


ठरला बेत आज...
पुन्हा तुझ्या भेटीचा..
पावसाने ही कहर केला..
आजही नेहमी सारखा..

त्यावर ही मात करुन..
भेटायचे ठरले..
थोडी कळ सोस..
आता काही क्षण उरले..

कसा बसा दिवस..
सुर्यास्ताकडे झुकला...
तुझ्या माझ्या भेटीचा..
रस्ता झाला मोकळा...

तू विचारलेस तेव्हढ्यात..
काय रे, कधी निघतो आहेस..
की पाऊस सोबत येईल..
याची वाट बघतो आहेस..

वेळेवर निघुन म्हटले..
वेळेत तूला गाठावं...
माझ्या मागून पावसानं..
असं मुसळधार बरसावं..

ठरलेल्या ठिकाणी पोचलो..
अन शोधू लागली तुला नजर..
थोडे मागे वळताच..
तू समोर हजर...

काय रे हे तू पण...
येताना पावसाला घेऊन आलास..
संध्याकाळी येणार नाही..
असे तुच म्हणाला होतास..

कमी आहे रे पाऊस..
कशाला छत्रीचे ओझे..
चल ना जरा भिजू ..
थेंब थेंब पावसाचे झेलू..

तूझ्या सोबत चालता चालता..
रिमझिम पाऊस कोसळत होता..
प्रत्येक थेंब त्याचा...
लपून आपल्याला पाहत होता..

थोड्या वेळातचं त्याचा..
त्याच्यावरचा संयम सुटला..
रिमझिम बरसणारा तो..
पुन्हा जोमाने कोसळू लागला..

उघडली छत्री मग मी..
भिजू नये म्हणून..
तू मात्र सावरीत स्वत:ला..
स्पर्श होऊ नये म्हणून...

पुढे जाता जाता..
रस्ता मागे पळत होता..
तुला मला एका छ्त्रीत पाहून..
पाऊस जोमाने कोसळत होता..

जाऊ आता घरी..
उशीर खुप झालाय..
आकाशात बघ..
पाऊस ही भरुन आलाय..

जाता जाता तुझं..
मागे वळून पाहणं..
तू पुढे जाई पर्यंत..
माझं तिथेच उभ राहणं...

एका नव्या भेटीच्या आशेने..
आज तूझा घेतला निरोप मी..
आठवणीत राहील अशी..
आज घडली भेट तूझी..
©*मंथन*™.. ०१/०८/२०१३

Post a Comment

Previous Post Next Post