तुझी वाट पाहताना..
डोळे येतात भरुन..
हृदय उल्हासित होते..
पाहिले जरी तुला दुरुन...
तु येण्याच्या वाटेवर..
मी रोज असतो उभा..
थोडा उशिर झाला की मनात..
भरते तुझ्या आठवनींची सभा..
त्या वेड्या सभेला...
तुझा नेहमीच उशीर..
तरी तू आलीस..
यातचं मी असतो खुशीत...
तुझं उशीरा येणे अन..
जाते जाते करत निघणं..
क्षणभर थांबून मला...
आपलेसे करुन जाणं...
आलीस तू एकदा..
मान खाली घालून..
मी तू तुझी होणारे नाही..
सांगून गेलीस हृदय चिरुन...
अजुन ही भरलयं मनात..
तुझ्या आठवणींचे तळे...
एकदा येशील का पहायला ते..
पुन्हा फुलतील प्रीतीचे मळे..
©*मंथन*™.. २०/०३/२०१२
Tags:
माझ्या कविता