शब्दांच्या जगात..
सारे कसे स्वच्छ..
मनातल्या भावनांना...
जसा सुगंधी गुच्छ...
शब्दांच्या शाळेत...
शब्दांच्याच भिंती..
शब्दांच्या बाकावर..
सारे शब्द कीती किती..
शब्दांच्या शाळे बाहेर..
शब्दांचेच मळे..
शब्दांच्या मातीत डोले..
शब्दांचीच फ़ुले..
शब्दांच्या जगात या..
शब्दच जगवतात..
शब्दांच्या मांडीवर..
शब्दचं निजवतात..
©*मंथन*™.. २१/०३/२०१२ रात्रौ ११.४०
Tags:
माझ्या कविता