कधी कधी इतिहासाची पाने...

कधी कधी इतिहासाची पाने...
वर्तमान बनून डोळ्या समोर येतात ...
भुतकाळातल्या घडामोडींना....
हळूच जागवुन जातात...

आठवतात ते क्षण...
जे मन प्रसन्न करुन जातात..
मोठे होता होता..
जे सारेच विखरून जातात....

विसरलेल्या काही आठवणी..
मध्येच डोके करतात वर....
आधी आम्ही आधी आम्ही
म्हणत मनात घोळ घालतात..

समोर येतो मग तो ..
बाबांनी आणलेला चेंडू...
आठवतय त्याला मिळवायला...
कसे लागलो होतो आपण भांडू...

इतिहासाचे पान आता झाले आहे जाळीदार...
आइ बाबा ताई दादा...सारेच त्यात जोडलेले..
जोडला जाईल त्यात आता माझाही जोडीदार...
आम्ही सर्वजण होऊ इतिहासाचे साक्षीदार..

©*मंथन*™..

Post a Comment

Previous Post Next Post