काल बाप्पा जाताना


काल बाप्पा जाता जाता
माझ्याशी बोलला खूप
कोरोना चे सावट पाहून
होतेय म्हणे खूप दुःख

तुमच्या पाठीशी आता
मलाच उभे राहावे लागणार
पण काय करणार सध्या मला
माझया घरी जावे लागणार

घरी गेलो की बाबांकडे
करतो त्याची तक्रार
तेच पाहून घेतील मग
काय आहे हा प्रकार

जिथं तिथं माझे भक्त
आजारी पडले आहेत
या आधी कधीच नाही
असे काही घडले आहे

तुम्ही तुमची काळजी घ्या
मी आहे सोबत तुमच्या
खबर घेतोच मी जाऊन
या परिस्थिची सध्याच्या
#मंथन

Post a Comment

Previous Post Next Post