स्वप्न पहिले मी..
काल रातीला उद्याचे..
ना कुणा जातीचे
ना कुणा धर्माचे..
नादत होते एकत्र..
रंक अन राव
नव्हता मनी कुणाच्या..
कोणता दुजा भाव..
प्रत्येक घरात होती..
भिंतीवर भारत माता..
शेजारी चं माझे..
शिव शंभो राजा..
महाराजांचे स्वराज्य..
उभे झाले होते...
जे पाहण्यास त्यांचे
डोळे आतुरले होते.
नव्हती मनात कुणाच्या..
देवाची त्या भिती
अंधश्रद्धा देखील त्यांनी...
वाहिल्या होत्या नदित..
सायंकाळी चाले तिथं..
तुकोबाचे अभंग...
नामदेवांची किर्तने..
रातीरातीला जागं..
असा माझा महाराष्ट्र..
मी उद्या देखील पाहिन..
एका रंगात नटलेला...
झिम्मा फुगडीत दंगलेला..
#मंथन २३/१०/२०१८